फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | फैजपूर येथे १७ जानेवारी धनाजी नाना महाविद्यालयात कवयित्री कुसुमताई चौधरी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान प्रा. डॉ. अरुणाताई चौधरी यांनी भूषविले. प्रास्ताविक प्रा. उन्नती चौधरी यांनी केले. परिचय डॉ. मनोहर सुरवाडे यांनी करून दिला.
”खानदेशातील काव्यानिर्मितीत कुसुमताई चौधरी यांचे योगदान ” या विषयावर कवयित्री संध्या भोळे यांनी कुसुमताई यांच्या कविता खानदेशातील समाज संस्कृती दर्शन घडवितात. लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला. ‘कमलगंध’ व ‘ मधुगंध,’ कुसुमताई यांच्या काव्यसंग्रहाचा आढावा घेतला, तसेच संध्या भोळे यांनी आपल्या “जावे गुंफितअक्षरे” यातील ‘माही भाषा माही माय’ या स्वरचित काव्यगीत सादर केले. डॉ.अरविंद चौधरी लिखित ” काय गतका फुटला…!” या विनोदी कथा संग्रहाचे प्रकाशन प्राचार्य डॉ.राजेंद्र वाघुळदे व प्राचार्य डॉ. अरूणाताई, विभाग प्रमुख डॉ. मनोहर सुरवाडे यांचे शुभहस्ते पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अरुणाताई चौधरी यांनी कुसुमताई यांचे व्यक्तित्व आणि साहित्य त्यातील त्यांच्या संवेदन शिलतेचे, प्रतिभेचे प्रभावी दर्शन घडवितात, अशा कवितांचा आढावा घेतला, “कोण तू”, “देवप्रिती” व ” असे क्षण आले गेले” या कवितांचे सादरीकरण करताना त्यांच्या आढवणीने त्यांना गहिवरून आले, असे दुर्मिळ नाते पहावयास मिळाले. कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य डॉ.आर. बी. वाघुळदे, रोहिणीताई चौधरी, सातपुडा विकास मंडळाचे झांबरे सर, उपप्राचार्य डॉ. विलास बोरोले, मराठी विभाग प्रमुख मनोहर सुरवाडे, डॉ.दीपक सुर्यवंशी, प्रा.विजय तायडे, प्रा. प्रिया बारी, डॉ. राजेंद्र ठाकरे व डॉ. राजेंद्र राजपूत, डॉ. राजश्री नेमाडे, डॉ.कल्पना पाटील सर्व मराठीचे विदयार्थी व विदयार्थीनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ.शरद बिऱ्हाडे यांनी केले.