मुंबई (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा म्हणजे विजयाची खात्री, हा समज या निवडणुकीत साफ खोटा ठरला आहे. कारण मोदी यांनी सभा घेऊनही राज्यातील विद्यमान आमदार पंकजा मुंडे आणि उदयनराजे भोसले यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.
एखाद्या मतदारसंघात आयोजित करण्यापूर्वीही भाजपकडून त्याची खूप तयारी आणि अभ्यास केला जातो. नरेंद्र मोदी ज्या ठिकाणी सभा घेतात त्या ठिकाणी उमदेवार सहज जिंकूनही येतात. पण यावेळी मात्र नरेंद्र मोदी यांनी सभा घेऊनही राज्यातील विद्यमान आमदार पंकजा मुंडे आणि उदयनराजे भोसले यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. परळीमध्ये त्यांनी पंकजा मुंडे आणि बीडमधील इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली आणि नंतर साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले आणि विधानसभेच्या इतर उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतली होती. या सभेमध्ये त्यांनी उदयनराजे भोसले यांना निवडून देण्याचे आवाहनही साताऱ्याच्या जनतेला केले होते. पण या दोन्ही ठिकाणी भाजपचे उमेदवार धक्कादायकपणे पराभूत झाले आहेत.