जळगाव (प्रतिनिधी) केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2019 मध्ये अधिसूचित क्षेत्रातील पिकांसाठी राज्यात 23 मे 2019 पासून मंजूरी देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत खरीप हंगाम 2019 करीता सहभागाची अंतिम मुदत 24 जुलै 2019 ही निर्धारित करण्यात आली होती.
तथापि, खरीप हंगाम 2019 प्रधानमंत्री पीक विमा योजनेपासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये. तसेच शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या तांत्रीक अडचणी विचारात घेता, खरीप हंगाम 2019 च्या सर्व शेतकऱ्यांना पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2019 या योजनेस दिनांक 29 जुलै, 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यातआली आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2019 प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.