प्लास्टिक देशातून हद्दपार होणार ; केंद्राच्या मार्गदर्शक सूचना जारी

download 8

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पर्यावरणाची हानी करणाऱ्या प्लास्टिक आता २ ऑक्टोबरपासून देशातून हद्दपार होणार आहे. केंद्र सरकारने प्लास्टिक बंदीसंबंधी राज्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.

 

केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, प्लास्टिकच्या अनेक वस्तूंचे उत्पादन बंद होऊ शकते. सध्या प्लास्टिक बॅग (हँडल आणि हँडल नसलेल्या), प्लास्टिक कटलरी, कप, चमचे, प्लेट आदींसह याशिवाय थर्माकोलच्या प्लेट, कृत्रिम फुले, बॅनर, झेंडे, प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिकचे फोल्डर आदींवर बंदी घालण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यानुसार प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक कटलरी आणि थर्माकोलपासून बनलेल्या वस्तूंचे उत्पादन २ ऑक्टोबरपासून पूर्णपणे बंद करण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न आहेत.

Protected Content