सावदा येथेही बिहार पॅटर्न अंतर्गत वृक्षारोपण

यावल प्रतिनीधी । तालुक्यातील वढोदा प्र.सावदा, रीधुरी करंज येथे बिहार पॅटर्न अंतर्गत जिल्हा परीषदच्या अध्यक्षा रजंना पाटील तसेच जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर सोनवणे यांचा हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामंडळेश्वर जनार्दन हरीजी महाराज होते.

या परिसरातील विविध ठिकाणी दरवर्षी विविध प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात येते मात्र वृक्ष रोपण झाल्यानंतर त्या वृक्षांचे संगोपन करण्यात येत नसते. या लागवड केलेल्या वृक्षांकडे कुणीही पाहत नसतात. मात्र महात्मा गांधी रोजगार हमी अंतर्गत बिहार पँटर्न च्या माध्यमातून विविध मान्वरांच्या प्रमुख उपस्थित रीधुरी, कंरज, वढोदा प्रगणे सावदा येथे विविध वनस्पतीच्या वृक्षांचे वृक्षरोपण यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामंडळेश्वर जनार्दन हरीजी महाराज होते.

बिहार पँटर्न अंतर्गत महात्म गांधी रोजगार हमी योजना व ग्रामपंचायत मार्फत लावण्यात आलेले झाडे तीन वर्षा पर्यत जगविण्यासाठी व त्यांचे संगोपन करण्यासाठी शासना कडुन निधी उपलब्ध होत असुन रोजगारांना रोजगार मिळत असल्यामुळे शासनाच्या या उपक्रमाचे कौतुक जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे यांनी केले.

यावेळी माजी जिल्हा परिषदचे सदस्य भरत महाजन, यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डाँ. निलेश पाटील, फैजपुर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक रोहीदास ढोंबरे, वैभव सोनवणे, दिपक सपकाळे, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, आशा स्वंयमसेविका, अंगणवाडी सेविका यांच्यासह  ग्रामस्थ मंडळी या वेळी उपस्थित होते.

 

Protected Content