विद्यापीठात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रासेयो विभागाच्या वतीने कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या हस्ते सोमवार १० जून २०२४ रोजी सकाळी वृक्षारोपणाचा कार्यक्रम विद्यापीठातील कर्मचारी भवन येथे संपन्न झाला.

रा.से.यो. विभागाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रारंभी कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांच्याहस्ते अंजन व बहावा यांची रोपे लावून विद्यापीठाच्या कर्मचारी भवन परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाला सुरुवात झाली. यानंतर विद्यापीठाचे वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा.अनिल डोंगरे, वित्त व लेखाधिकारी सीए रवींद्र पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, नवसंशोधन, नवोपक्रम व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. राजेश जवळेकर, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. आशुतोष पाटील, रा.से.यो. संचालक डॉ. सचिन नांद्रे, क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील, प्रभारी कार्यकारी अभियंता एस.आर. पाटील, उपअभियंता आर.आय. पाटील, उपकुलसचिव डॉ. मुनाफ शेख, एन.जी. पाटील, सुनील हतागडे व इतर उपस्थितांच्या हस्ते रोपे लावण्यात आले. अंजन व बहावाची एकूण ४० रोपे यावेळी लावण्यात आली. उद्यान विभागाच्या अश्विनी पाटील व त्यांच्या सहकार्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.

Protected Content