जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुस्लिम बांधवांचा आगामी पवित्र सण मोहरम निमित्ताने नियाज अली नगरातील सुन्नी ईदगाव मैदानात पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याहस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
सध्या जगात सर्वत्र हिरवे घनदाट जंगल कापून सिमेंटचे जंगल उभारले जात असून यामुळे निसर्गाचे, पर्यावरणाचे अतोनात नुकसान होत असून याचे दुष्परिणाम ग्लोबल वार्मिंग वर होत असून हे सर्व मानव व प्राणी वर्गासाठी अत्यंत धोकेदायक व गंभीर आहे. वृक्ष हे कार्बन डाय-ऑक्साइड तसेच इतर विषारी वायू स्वतः शोषून आपणाला स्वच्छ हवा व ऑक्सिजन देत असतात ज्यामुळे आपले जीवन सुखात असते. परंतु आता सर्वत्र सरासर वृक्षांची कत्तल होत असून आपल्या येणाऱ्या पिढ्या यांसाठी हा धोकेदायक प्रकार असून यामुळे निसर्गाची फार मोठी हानी होत आहे.
तसेच पवितत्र इस्लाम धर्मात व अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद सलै.(अल्लाह ची त्यांच्यावर कृपादृष्टी असो) यांनी तर आज पासून सुमारे १४५० वर्षांपूर्वीच निसर्गाचे व वृक्षांचे संगोपन करण्यासंबंधी आदेश दिलेले असून इस्लाम धर्मात वृक्षांची कत्तल करण्यास व निसर्गाचे , पर्यावरणाचे नुकसान करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. शजरकारी (वृक्षारोपण) करून वृक्षांचे संवर्धन करून त्यांची निगा राखून सर्वत्र हरियाली (हिरवेगार परिसर) करण्याचे प्रेषितांचे आदेश आहे. म्हणून आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
याप्रसंगी सुन्नी ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष सै. अयाज अली नियाज अली यांनी आपल्या मनोगतातून पर्यावरण संवर्धनाविषयी नागरिकांनी जागरूकता करून सर्वांनी निदान कमीत कमी एक तरी झाड लावून त्याला जगवावे. शुद्ध हवा ही कुठेही विकत मिळत नसून याच वृक्षांमुळे ती आपल्याला मिळणार आहे. याप्रसंगी 20 लिंबाची झाडं लावण्यात आली असून पुढे मोहीम राबवून विविध भागांत अजून वृक्ष लावण्यात येणार आहेत.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, सुन्नी ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष सै. अयाज अली नियाज अली, हाजी इकबाल वजीर, हाजी मुक्तार शहा, शेख जमील, हाजी रफिक कुरेशी, हाजी शेख सलीमुद्दिन, हाजी अजमल शाह, शफी ठेकेदार, सय्यद उमर, इलियास नुरी, अफजल मणियार, छोटू पटेल, शेख विकार, शेख शोएब जमील, हुसेन खान, इरफान पिंजारी, फैजान कादरी इत्यादी उपस्थित होते.