‘गोदावरी इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च’तर्फे वृक्षारोपण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च व रोटरी क्लब जळगाव एलाइट यांच्या संयुक्त विदयमाने एमआयडीसी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

 

कार्यक्रमाच्या सुरवातीस रोटरी क्लब जळगाव एलाईटचे प्रेसिडेंट रोटारियन अजित महाजन यांनी झाडांचे महत्व व त्यांची गरज या विषयी माहिती दिली. यावेळी गोदावरी इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयाचे संचालक रोटारियन डॉ.प्रशांत वारके यांनी वेगवेगळ्या झाडांची माहिती, त्याचे फायदे सांगितले व आजच्या वाढत्या जागतिक तापमानवाढीमुळे निसर्गावर होणारा परिणाम आणि झाडे लावून आपण त्यावर मात करू शकतो असे सांगितले. सदर  वृक्षारोपण जळगाव एमआयडीसी परिसरात झाला. यामध्ये प्रामुख्याने वड, पिंपळ, नीम इत्यादी झाडे लावली.

 

या कार्यक्रमास रोटरी क्लब जळगाव एलाईटचे प्रेसिडेंट रोटारियन अजित महाजन, सेक्रेटरी रोटारियन अनिकेत निरखे, रोटारियन नितीन इंगळे, रोटारियन डॉ. प्रशांत वारके, रोटारियन चंदन कोल्हे, रोटारियन सचिन चौधरी, रोटारियन राजू बियाणी, रोटारियन श्रीराम परदेशी, गोदावरी इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयाच्या डॉ. नीलिमा वारके यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content