Home क्राईम बँक खाते हॅक करून शेतकऱ्याची साडेपाच लाखांची ऑनलाईन फसवणूक !

बँक खाते हॅक करून शेतकऱ्याची साडेपाच लाखांची ऑनलाईन फसवणूक !

0
179

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याचे बँक खाते हॅक करून अज्ञात भामट्याने तब्बल ५ लाख ४९ हजार ४०१ रुपयांची ऑनलाईन लूट केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत मंगळवारी १७ मार्च रोजी दुपारी ५ वाजता सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील पाटणा येथील रहिवासी महेश ईश्वर जामदार (वय ३१) यांचे सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या स्टेशन रोड शाखेत बचत खाते आहे. २१ फेब्रुवारी ते २७ २०२६ या कालावधीत अज्ञात सायबर चोरट्याने जामदार यांचा मोबाईल क्रमांक (जो बँक खात्याशी लिंक होता) तो हॅक केला.

या हॅकिंगद्वारे चोरट्याने जामदार यांच्या बँक खात्याचा ताबा मिळवला आणि वेळोवेळी विविध बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केले. काही दिवसांतच जामदार यांच्या खात्यातून ५ लाख ४९ हजार ४०१ रुपये लंपास करण्यात आले. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जामदार यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.


Protected Content

Play sound