ओढरे येथे ग्लोबल बंजारा अस्तित्व संस्थेतर्फे वृक्षारोपण

चाळीसगाव प्रतिनिधी । पर्यावरण संवर्धन हेच आजच्या काळाची गरज आहे. या पाश्वभूमीवर तालुक्यातील ओढरे येथे ग्लोबल बंजारा अस्तित्व संस्थेच्या वतीने आज वृक्षारोपण करण्यात आले.

शिवनेरी फाउंडेशनच्या वतीने शंभर झाडांची रोपे हे ग्लोबल बंजारा अस्तित्व संस्थेला मंगळवार रोजी प्राप्त  झाल्याने या संस्थेच्या वतीने ओढरे येथे वृक्षारोपण करण्यात आले. तत्पूर्वी ग्लोबल बंजारा अस्तित्व संस्थेचे अध्यक्ष अशोक राठोड यांनी पर्यावरणाविषयी मार्गदर्शन करून कोणत्या‌ झाडांची लागवड कोठे करावी याविषयी संबोधित केले. त्याचबरोबर कोरोनाच्या काळात  ऑक्सिजनच्या अभावामुळे अनेक जणांना जीव गमवावा लागला. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या अशा माहामारी पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी पर्यावरणाचा संगोपन व संवर्धन हेच एकमेव रामबाण उपाय असल्याचे प्रतिपादन अशोक राठोड यांनी केले. तसेच शिवनेरी फाऊंडेशनने वृक्षारोपणासाठी झाडे उपलब्ध करून दिल्याने ग्रामस्थांनी आभार मानले. 

यावेळी ग्रामसेवक मधुकर जाधव, ग्रामपंचायत सदस्या भारती राठोड, शिवाजी बावचे, एकलव्य भिल समाज संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख नवनाथ पवार, सामाजिक कार्यकर्ते धनराज चव्हाण, जेष्ठ नागरिक नामदेव राठोड, ग्रा. सदस्य गजानन चव्हाण, राहुल राठोड, जीवन जाधव, दगा गायकवाड, लक्ष्मण राठोड, ज्ञानेश्वर पवार, अंकुश पवार, शिवानंद राठोड, राकेश गवळी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Protected Content