ब्रेकींग : रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांवर स्थानबध्दतेची कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील अट्रावल आणि एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली असून एकाला कोल्हापूर तर दुसऱ्याला अमरावती कारगृहात रवाना करण्याचे आदेश आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी गुरूवारी १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.  दिवाकर उर्फ पिंटू टोपलू तायडे वय-४१ रा. अट्रावल ता. यावल आणि भिकन रमेश कोळी वय-३५ रा. उत्राण ता. एरंडोल असे स्थानबध्द केलेल्या गुन्हेगारांचे नाव आहे.

जळगाव जिल्ह्यात हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, विनापरवाना वाळू वाहतूक करणारे आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्तींवर एमपीडीए कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या होत्या. या अनुषंगाने यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिवाकर उर्फ पिंटू टोपलू तायडे वय-४१ रा. अट्रावल ता. यावल आणि एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील गुन्हेगार भिकन रमेश कोळी वय-३५ या दोघांविरोधात स्थानबद्ध करण्याचे कारवाईचा अहवाल संबंधित पोलीस ठाण्याच्या वतीने जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या विभागात देण्यात आला. दरम्यान या प्रस्तावाचे अवलोकन करत हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात मंजूरीसाठी पाठविण्यात आला.  दरम्यान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दोघांवर स्थानबध्दतेच्या कारवाईला मंजुरी दिली आहे. यात गुन्हेगार दिवाकर उर्फ पिंटू टोपलु तायडे याला कोल्हापूर येथील कारागृहात तर दुसरा गुन्हेगार भिकन रमेश कोळी याला अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश काढले आहे. अशी माहिती  स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी गुरूवारी १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता काढले आहे.

यांचे मिळाले सहकार्य 

या प्रस्तावासाठी कासोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ, गणेश वाघमारे, सहदेव घुले, सहाय्यक फौजदार रवींद्र पाटील, पोलीस कॉन्स्टेबल नितीन पाटील, जितेश पाटील, इमरान पठाण, महिला पोलीस कॉन्स्टेबल सविता पाटील, पोलीस कॉन्स्टेबल गोरख बागुल, नंदलाल पाटील, भगवान पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण चौधरी तसेच यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल वासुदेव मराठे, संदीप सूर्यवंशी, भरत कोळी, योगेश कोळी, किशोर परदेशी, सुशील घुगे, यांनी परिश्रम घेतले.

Protected Content