रेकार्डवरील गुन्हेगारला कारागृहात केले स्थानबध्द; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील वाळू तस्कारी करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगाराला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश शनिवारी २ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता दिले आहे. त्यानुसार रेकॉर्डवरील गुन्हेगाराला ताब्यात घेत रविवारी ३ डिसेंबर रोजी सकाळी भडगाव पोलीस कर्मचारी नागपूर येथे रवाना झाले.  संजय सुरेश त्रिभुवन वय -२६ रा.वाक ता.भडगाव असे स्थानबद्ध केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले तसेच औषधीजन्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती आणि विनापरवाना वाळू तस्कर करणारे, अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या गुन्हेगारांवर स्थानबध्द आणि हद्दपारी करण्याच्या कारवाया करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेले आहेत. या अनुषंगाने भडगाव तालुक्यातील वाक येथे राहणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार संजय त्रिभुवन याच्या विरोधात हद्दपारची कारवाई करावी, यासाठी भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी प्रस्ताव तयार केला, हा प्रस्ताव जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात पाठवला. या प्रस्तावाचे अवलोकन करून स्थानबद्ध करण्याच्या मंजुरीसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे प्रस्ताव मंजुरीसाठी रवाना केला. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शनिवारी २ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता प्रस्तावाला मंजुरी देत रेकॉर्डवरील गुन्हेगार संजय त्रिभुवन याला नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानुसार भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पोकॉ. प्रवीण परदेशी, संदीप सोनवणे, जितू राजपूत अशांनी रेकॉर्ड वरील गुन्हेगार संजय त्रिभुवन याला ताब्यात घेत नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात देण्यात आले.

Protected Content