सावदा प्रतिनिधी । शहराच्या दुतर्फा रावेर रोडवरील एलआयसी इमारती आणि फैजपूर रोडवरील साईबाबा मंदिराजवळील खान्देशची जीवनरेखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील खड्डे येत्या दोन दिवसात बुजविण्यात येतील, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम विभाग उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता बी.एन. शेख यांनी सावदा येथील माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राजेश वानखेडे यांना दिली आहे.
बऱ्हाणपुर अंकलेश्वर महामार्गावर दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते यात सावदा येथून केळीने भरलेले ट्रक नेहमी ये-जा करीत असतात व या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे केळी वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांचा मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असते वेळप्रसंगी गाडी नादुरुस्त होऊन शेतकऱ्याचा माल जागेवरच पिकण्याची भीती असते त्यामुळे या महामार्गावरील खड्डे तात्काळ बुजवण्यात यावे अन्यथा या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल अशी चेतावणी सावदा शहराचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजेश वानखेडे यांनी दिली होती त्याची तात्काळ दखल घेत कार्यकारी अभियंता बी एन शेख यांनी या महामार्गावरील खड्डे येत्या दोन दिवसात बुजवण्यात येतील असे सांगितले आहे
राजेश वानखेडे यांनी केले वृक्षारोपण
सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता यांना सावदा येथील बरानपुर अंकलेश्वर महामार्ग च्या खड्या संदर्भात भेट घेण्यासाठी गेले असता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात बी एम शेख यांनी वानखेडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून घेतले यावेळी दोन दिवसात सावदा येथील खड्डे न बुजवल्या त्या खड्ड्यामध्ये देखील असं वृक्ष रोपण करण्यात येईल असा इशाराही वानखेडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.