धरणगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने पिंप्री येथील समाज बांधवांसह भजनी मंडळ यांच्या माध्यमातून गावातून दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, यावेळी दिंडीच्या माध्यमातून सामाजिक जागृतीचा संदेश देण्यात आले.
सेना महाराज हे एक मराठी वारकरी संत असून त्यांना ज्ञानदेव-नामदेवांच्या परिवारातील मानले जाते. संत नामदेव, नरहरी सोनार, परिसा भागवत. जनाबाई, चोखामेळा या संतांप्रमाणे संत सेनांचे कोठेही स्वतंत्र, सांगोपांग चरित्र उपलब्ध नाही. समकालीन संतांनी सेना महाराजांचा एक विठ्ठलाचे निःसीम भक्त म्हणून आपल्या अभंगांमधून उल्लेख केला आहे. (संत जनाबाई) शिखांचा धर्मग्रंथ, ‘गुरुग्रंथसाहिब’ या पवित्र ग्रंथात संत सेनांच्या एका पदाचा समावेश केला आहे. त्यांच्या अनेक उत्तरकालीन संतांनी, हिंदी-मराठी संशोधकांनी त्यांच्या काव्याचा अभ्यास मांडलेला आहे.
प्रसिद्ध संत सेना महाराज व्यवसायाने न्हावी होते. त्यांचा प्रसिद्ध अभंग : आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक ।। विवेक दर्पण आयना दाऊ । वैराग्य चिमटा हालऊ ।। उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळू ।। भावार्थाच्या बगला झाडू । काम क्रोध नखे काढू । चौवर्णा देऊनी हात । सेना राहिला निवांत ।।
याप्रसंगी नाभिक समाज पिंप्रीचे अध्यक्ष राजेंद्र बोरसे, सर्व सदस्य व समाज बांधव उपस्थित होते . तसेच अरुण चित्ते, नाना सूर्यवंशी, रमण बोरसे, बापू महाले, देविदास सोनगीरे, संतोष सोनावणे, संतोष सोनगीरे, जयेश सोनगीरे, राजेंद्र सोनवणे, हिम्मत सोनवणे, एकनाथ सोनगीरे, नवल, सोनगीरे गजानन बोरसे, निलेश सोनगीरे, दादा निकम आणि समस्त नाभिक समाज बांधव पिंप्री आदी उपस्थित होते.