पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशनमध्ये आज पोलीस जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकूण ३५ तक्रारींचा निपटारा करण्यात आला अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांनी दिली.
राज्यातील प्रत्येक पोलीस विभागीय क्षेत्रात जनता दरबाराचे आयोजन करून नागरीकांच्या तक्रारी त्वरीत मार्गी लावाव्यात असे निर्देश शासनाकडून देण्यात आले आहे. दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी जनता दरबारचे आयोजन करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे.
जळगाव पोलीस विभागातील तालुका पोलीस ठाण्याच्या ग्रामीण भागातील पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिस स्टेशन, येथे नागरीकांसाठी आज शनिवार, दि. २ जुलै रोजी सकाळी १० ते १२ वाजेच्या दरम्यान “जनता दरबार”चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १२ प्रलंबित तक्रारींचा निपटारा करण्यात आला. नागरीकांच्या कौटुंबिक, शेतीचा वाद, सामाईक भिंतचा वाद, शेतातच्या बांधावरील वाद देखील तातडीने सोडविण्याच्या सुचना संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे, पोलिस नाईक शिवनारायण, देशमुख, पोलिस हेड कॉंन्स्टेबल राकेश खोंडे, पांडुरंग गोरबंजार, पोलिस कॉंन्स्टेबल ज्ञानेश्वर बोडखे, दिपक पाटील, मुकेश लोकरे, पंकज सोनवणे, दिपक बडगुजर, संभाजी सरोदे, अमोल पाटील, प्रमोद वडीले, चालक दिपक अहिरे, महिला पोलिस कर्मचारी योगिता चौधरी, शिपाई सागर सावळे सह पिंपळगाव (हरे) परिसरातील गावामंधील सरपंच, उपसरपंच, सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, पत्रकार बांधव आणि तरुणांची उपस्थिती होती.