चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील विष्णापूर येथील माहेर आलेल्या विवाहितेला माहेरहून २ लाख रूपये आणावे यासाठी शारिरीक व मानसिक छळ केल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात पतीसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अडावद पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील विष्णापूर येथील माहेर असलेल्या शितल मुकेश पाटील (वय-२५) यांचा विवाह धुळे जिल्ह्यातील साक्री येथील मुकेश लोटन पाटील यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नानंतर पती मुकेश याने विवाहितेला माहेरहून २ लाख रूपये आणावे यासाठी शारिरीक व मानसिक छळ केल्याचा प्रकार घडली. यासाठी सासरे, सासू, पुतण्या आणि नणंद यांनी पैशांसाठी तगादा लावला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्यात. त्यांनी अडावद पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती मुकेश पाटील, सासरे लोटन हरी पाटील, सासू बेबीबाई लोटन पाटील, पुतण्या करण अनिल पाटील सर्व रा. दुसाने ता साक्री जि. धुळे आणि नणंद शारदा जगदीश सुर्यवंशी रा. तडोदा जि. नंदूरबार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नशिर तडवी हे करीत आहे.