चाळीसगाव प्रतिनिधी । घर बांधण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये असे सांगून महिलेचा सासरच्यांनी शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार उघडकीस आले असून याबाबत शहर पोलिस ठाण्यात आज फिर्याद दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, कविता महेंद्र चौधरी (वय- ३४ रा. जयहिंद कॉलणी ता. नंदुरबार) येथे पतीसह सासरच्यांसोबत वास्तव्यास आहेत. घर बांधण्यासाठी पैसे नसल्याने पतीसह सासरच्यांकडून कविता चौधरी हिला नेहमी शारीरिक व मानसिक त्रास दिला जात होता. दरम्यान तुझ्या आई-वडीलांकडून (ह. मु. मॉं. सरस्वती निवास ता. चाळीसगाव) पाच लाख रुपये घेऊन न आल्यास जिवे ठार मारण्याची धमकी मिळाल्याने शेवटी आज दि.२० मार्च रोजी शहर पोलिस ठाण्यात पतीसह अन्य सहा जणांवर विविध कलमान्वये फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीने पुढील व्यक्तींवर फिर्याद दाखल केली आहे. पती महेंद्र दला चौधरी, सासु कमलाबाई दला चौधरी, नणंद अश्विनी संदिप चौधरी, नणंद मिना राजेंद्र सुर्यवंशी, माधुरी महेश मचाले, दुर्गा यतीन बोरसे व भाची कु. प्रियंका राजेंद्र सुर्यवंशी आदी विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल आहेत. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि नि. अ. सैय्यद हे करणार आहेत.