नवी दिल्ली वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर १२ पैशांची वाढ केली आहे. डिझेलचे दर अजिबात बदललेले नाहीत.
मागच्या चार दिवसात दिल्लीमध्ये पेट्रोल ४६ पैशांनी महागले आहे. इंडियन ऑईलच्या वेबसाइटवर असलेल्या माहितीनुसार दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये प्रतिलिटर पेट्रोलचा दर अनुक्रमे ७४.६६ पैसे, ७७.३४ पैसे, ८०.३२ पैसे आणि ७७.६२ पैसे आहे. तर दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये डिझेलच्या किंमती बदललेल्या नाहीत. मुंबईमध्ये प्रतिलिटर डिझेलचा दर ६८.९४ पैसे आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढणाऱ्या, घटणाऱ्या दरांचा महागाईवर परिणाम होत असतो. सध्या आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चा तेलांचे दर वाढत चालले आहेत.