हैद्राबाद पोलिस एन्काऊंटर विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

SupremeCourtofIndia

हैदराबाद वृत्तसंस्था । हैदराबाद येथील डॉ. प्रियंका रेड्डी यांच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. याप्रकरणी ताब्यात असलेल्या चारही आरोपींचे शुक्रवारी पोलिसांनी एन्काऊंटर केले होते. पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत असताना, पोलिसांच्या या कारवाईवर प्रश्नदेखील उपस्थित होत असून या एन्काउंटरविरोधात आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

अॅडव्होकेट सीएस मणी आणि प्रदीप कुमार यादव यांनी हैदराबाद एन्काउंटरविरोधात सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी कोर्टाने सन २०१४ ला दिलेल्या निर्देशांचे पालन केलेले नाही, असे या याचिकाकर्त्यांनी कोर्टात म्हटले आहे. या एन्काउंटरमध्ये सहभागी असलेल्या पोलिसांविरोधात एफआयआर करण्याची आवश्यकता असून त्यांच्यावर कारवाई केली जावी असे याचिकेत म्हटले आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी होणार आहे. या व्यतिरिक्त, सुप्रीम कोर्टात या प्रकरणाशी संबंधित आणखी एक याचिका करण्यात आली आहे. ती आहे या एन्काउंटर कारवाईचे समर्थन करणाऱ्यांविरोधात. वकील मनोहरलाल शर्मा यांनी ही याचिका केली आहे. त्यांनी मीडियावरदेखील गॅग ऑर्डर चालवण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

Protected Content