Home क्राईम चॉपर घेऊन दहशत पसरवणार्‍यास अटक

चॉपर घेऊन दहशत पसरवणार्‍यास अटक

psycho 2952528 1280
psycho 2952528 1280

psycho 2952528 1280

 

जळगाव (प्रतिनिधी) येथील एमआयडीसी परिसरातील गुरांचा बाजार असलेल्या भागात एक तरुण हातात चॉपर घेऊन दहशत निर्माण करीत असताना एमआयडीसी पोलिसांनी त्याला अटक केली असून ताब्यातील चॉपर जप्त केला आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसात आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, संशयित आरोपी नवनाथ आसाराम शिंदे (वय २७), रा. रामनगर, जळगाव हा काल मध्यरात्री २.३० वाजेच्या सुमारास गुरांच्या बाजाराजवळ हातात चॉपर घेऊन फिरत होता. याबाबत एमआयडीसी पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यावरून एमआयडीसी पथकातील सहाय्यक फौजदार रामकृष्ण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल निलेश पाटील, सचिन चिंचोले, अशोक सनगत, संदीप पाटील यांचे पथक तिकडे रवाना झाले. त्यांनी मोठ्या शिताफीने नवनाथला ताब्यात घेऊन त्याच्या हातातील चॉपर हस्तगत केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात आर्म अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound