पिंप्राळा येथील विवाहितेचा पैश्यांसाठी छळ; चार जणांविरोधात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा येथील विवाहितेचा हुंड्याच्या पैशांसाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मंगळवारी 25 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता पतीसह चार जणांविरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामानंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  मनीषा विजय पाटील वय 40 रा.विर सावरकर, पिंप्राळा जळगाव यांचा विवाह १५ ऑक्टोबर २०२० रोजी भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील विजय पाटील यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाच्या काही दिवसानंतरच पती विजय पाटील याने विवाहितेला माहेरहून पैसे आणावे यासाठी तगादा लावला. परंतु विवाहितेच्या आई-वडिलांची परिस्थिती हालाखीचे असल्यामूळे पैशांची पूर्तता करू शकली नाही. यामुळे पती विजय पाटील याने विवाहितेला शिवीगाळ करून मानसिक व शारीरिक छळ केला. यासाठी सावत्र मुलगी, मध्यस्ती असलेले दाम्पत्य यांनी देखील टोमणे मारून शिवीगाळ करून गांजपाठ केला.

हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता जळगाव शहरातील पिंपळा येथील माहेरी निघून आल्या.  विवाहितेने रामानंदनगर पोलिस ठाण्यात मंगळवारी 25 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती विजय काशीनाथ पाटील, सावत्र मुलगी कोमल विजय पाटील दोन्ही रा. फुलगाव ता. भुसावळ,  मध्यस्थी असलेले शिवाजी जयराम पाटील आणि आशाबाई जयराम पाटील दोन्ही रा. वडनगरी ता.जि. जळगाव यांच्याविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक ज्ञानेश्वर पाटील करीत आहे.

 

Protected Content