राज्याच्या बाहेरील लोक शांतता भंग करण्याच्या प्रयत्नात : गृहखाते सतर्क

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत अल्टीमेटम दिला असतांनाच राज्याच्या बाहेरीला काही लोक येथे येऊन शांतता भंग करू शकतात अशी शक्यता गृह खात्याने वर्तविली असून यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत राज्यातील मशिदींवरील भोंगे उतारण्यासाठी ४ मे या तारखेचा अल्टीमेटम दिला आहे. यामुळे गृहखात्याने सावध पवित्रा घेतला आहे.  अशातच राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी बाहेर व्यक्ती राज्यात धुडगूस घालण्याची शक्यता आहे, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना महत्त्वाच्या सूचना दिल्या असून कारवाईचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहखात्याकडून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे.  कायदेशीर कारवाई करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस महासंचालकांना आदेश दिले आहे. आज दुपारीच मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्यात फोन वरून चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कायदा सुव्यवस्थाबाबत माहिती दिली.

यावेळी गृहमंत्री वळसे आणि सीएम बैठकीत राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर चर्चा झाली.  राज्यात उद्या गुरुवारी दिवशी परराज्यातील लोक येत काहीस कायदा सुव्यवस्था मुद्दा बिघडू शकतात अशी शक्यता आहे, असे रिपोर्ट गृह विभागाला मिळाले आहे. यामुळे राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली असून औरंगाबाद येथे राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यांना अटक होण्याची शक्यता सुध्दा वर्तविण्यात येत आहे.

पोलीस विभागाला खबरदारी घेण्याच्या सूचना गृह मंत्रालय यांनी दिल्या आहे.  राज्यातील कायदा सुव्यवथा नियंत्रण ठेवावी योग्य ते निर्णय घेत कठोर कायदेशीर कारवाई करा असे आदेशच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहे.

 

Protected Content