गेला तेजस मोरे कुणीकडे ? : ‘हाय प्रोफाईल’ प्रकरणात नाव आल्याने सर्वांना उत्सुकता

जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट | संपूर्ण राज्याला हादरा देणार्‍या ‘पेन ड्राईव्ह’ प्रकरणातील व्हिडीओ चित्रीकरण प्रकरणात विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी जळगावकर तेजस मोरे याचे थेट नाव घेतल्याने हा व्यक्ती आहे तरी कोण याबाबत उत्सुकता लागली आहे. जळगावातील तेजस मोरे याच्या घरात भाडेकरू राहत असून तो सध्या पुण्यास वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली असली तरी इतक्या हाय-प्रोफाईल स्टींगमध्ये नाव आल्याने तेजस मोरे नेमका कुठे गेलाय ? याबाबत मोठी उत्सुकता लागली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत मोठा गौप्यस्फोट करत आ. गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या अन्य नेत्यांना अडकवण्यासाठी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण हेच कसा प्रयत्न करत होते ? हे दर्शविण्यासाठी विधानसभाध्यक्षांना तब्बल सव्वाशे तासांचे व्हिडीओ फुटेज सोपविल्याने खळबळ उडाली आहे. यात गिरीश महाजन यांना मोक्का लावण्यासाठी ऍडव्होकेट चव्हाण हे संबंधीतांना सूचना करत असल्याचे यातील काही व्हिडीओजच्या माध्यमातून दर्शविण्यात आले. यातील निवडक व्हिडीओ प्रसारमाध्यमांना देण्यात आले असून उर्वरित सर्व व्हिडीओ फुटेज हे विधानसभाध्यक्षांना सुपूर्द करण्यात आले. या माध्यमातून फडणवीस यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट.

दरम्यान, फडणवीस यांच्या पेन ड्राईव्ह प्रकरणातील बहुतांश धागेदोरे हे जळगावशी जुळलेले असल्याचे तात्काळ अधोरेखीत झाले होते. यात जळगाव मविप्र संस्थेतील वादाशी संबंधीत गुन्ह्यांचा उल्लेख असून याच प्रकरणात आमदार गिरीश महाजन यांच्यासह इतरांवर निंभोरा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणाच्या केंद्रस्थानी असणारे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण हे मूळचे भडगाव तालुक्यातील रहिवासी असून त्यांनी आधी घरकूल प्रकरणात केलेल्या कामगिरीमुळे त्यांना मोठी प्रसिध्दी मिळाली होती. मात्र फडणवीस यांनी सादर केलेल्या स्टींगमुळे त्यांच्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले. मंगळवारी स्टींग केल्यानंतर प्रवीण चव्हाण यांनी तात्काळ हे व्हिडीओज मॉर्फ केले असल्याची प्रतिक्रिया दिली होती. तर आज त्यांनी आपल्या कार्यालयातून हे चित्रीकरण कसे केले ? याची सविस्तर माहिती दिली. लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट.

प्रवीण चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार मूळचा जळगाव येथील तेजस मोरे हा तरूण त्यांच्याकडे जामीनच्या कामासाठी आला होता. त्याने चव्हाण यांना भिंतीवरील घड्याळ भेट दिले होते. याच घड्याळातील छुप्या कॅमेर्‍याच्या मदतीने आपले चित्रीकरण करण्यात आले. आणि याच व्हिडीओजमध्ये छेडछाड करून ते विधानसभेत सादर करण्यात आल्याची माहिती प्रवीण चव्हाण यांनी दिली. लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट.

दरम्यान, या संदर्भातील माहिती येताच तेजस मोरे हा नेमका कोण आहे याबाबत सर्वांची शोधाशोध सुरू झाली. प्रसारमाध्यमांनी त्याचे जिल्हा परिषद कॉलनीत घर असून तेथे सध्या भाडेकरू राहत असल्याचे शोधून काढले. दरम्यान, या संदर्भातील माहितीनुसार तो रवींद्र मोरे या जिल्हा परिषदेतील सेवानिवृत्त अधिकार्‍याचा मुलगा असल्याची माहिती समोर आली. शेजार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार तो सुस्वभावी असून मध्यंतरी त्याने पुणे येथे कन्स्ट्रक्शनची कामे सुरू केली होती. मात्र यातीलच एका फसवणुकीच्या प्रकरणात तो सहा महिने कारागृहात होता. तेव्हाच जामीनाशी संबंधीत त्याचा प्रवीण चव्हाण यांच्याशी संपर्क आला असावा असे आता मानले जात आहे.

Protected Content