मुंबईत बेस्ट बसने पादचाऱ्यांला उडवले

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबईतील कुर्ल्यातील लाल बहादूर शास्त्री मार्गावर झालेल्या बेस्ट बसच्या अपघाताची घटना ताजी असतानाच आता मुंबईत पुन्हा असाच अपघात झाला आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) परिसरामध्ये बेस्ट बसने एकाला उडवले. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. जीपीओ परिसरामध्ये बेस्ट बसने एका पादचाऱ्याला उडवलं. अपघातानंतर बस चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार ए२६ या बसने रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्याला उडवले. या घटनेत व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे.

सोमवारी (९ डिसेंबर) रात्री मुंबईच्या कुर्ला भागात बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. भरधाव बेस्ट बसने अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात बस खाली चिरडलेल्या ७ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत ३३ जण जखमी झाले. कुर्ला येथील आंबेडकर नगर परिसरातून ३३२ क्रमांकाची बस अंधेरी कडे निघाली होती, यावेळी बस चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला. याप्रकरणी बस चालक संजय मोरे याला पोलिसांनी अटक केली.

Protected Content