ठेकेदारांच्या कामांची बिले अदा करा : महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे कामबंद आंदोलन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागासह ग्रामविकास विभाग, जलजीवन मिशन विभाग आणि जलसंधारण विभागात होणारे विकास काम करणाऱ्या ठेकेदारांचे कामे केलेली बिले अदा करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष अभियंता राहुल सोनवणे यांच्या नेतृत्वात गुरुवारी २७ जून रोजी दुपारी २ वाजता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात काम बंद आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांना देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग जलजीवन मिशन विभाग तसेच जलसंधारण विभाग सारख्या ठिकाणी शासनाचे विभागाकडे ठेकेदारी पद्धतीने नुसार काम केले जाते. परंतु अद्यापपर्यंत ठेकेदारांचे गेल्या दोन वर्षांपासून पूर्ण केलेल्या कामांची बिले निघालेली नाही. त्यामुळे पुढील काम करण्यास त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. शिवाय यावेळी अनेकवेळा पत्रव्यवहार आंदोलन, निवेदने यांच्या माध्यमातून ठेकेदारांची पिले अदा करावी, यासाठी मागणी केली होती. परंतु शासन तसेच मंत्री व प्रशासनाकडून अद्यापपर्यंत बिल अदा करण्याबाबत कोणताही प्रयत्न करण्यात आलेला नाही. त्यामुळे राहिलेली कामांची बिले ही तातडीने ठेकेदारांना देण्यात यावी या मागणीसाठी गुरुवारी २७ जून रोजी दुपारी २ वाजता जळगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने काम बंद आंदोलन करण्यात आले.

जोपर्यंत ठेकेदारांना केलेल्या कामाची बिले मिळत नाही, तोपर्यंत कामबंद राहील असा पवित्रा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अभियंता राहुल सोनवणे यांनी केले आहे. याप्रसंगी प्रमोद नेमाडे, विकास महाजन, संजय पाटील, मिलिंद अग्रवाल, विजय बडे, प्रदीप पाटील, योगेश पाटील, उज्वलकुमार बोरसे, सुशीलकुमार डोंगरे, शेखर तायडे, श्रीराम चौधरी यांच्यासह इतर ठेकेदारांनी काम बंद आंदोलनात सहभाग नोंदवला होता.

Protected Content