पवार साहेब, वयाला शोभेल असे वक्तव्य करा! – भाजपचे ट्वीट

मुंबई/ सातारा,  लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथील सभेत वक्तव्य केले. यावरून  पवार साहेब या वयात आपल्याला शोभेल असे वक्तव्य करा, असे भाजपने ट्वीट करीत गंभीर आरोप केले आहेत.

राज्यात सध्यस्थितीत हिंदुत्वाच्या भोवती राजकारण फिरत असून साताऱ्यात एका सभेत पवार यांनी औरंगाबाद येथील महाविद्यालयातील विध्यार्थ्यांचे उदाहरण देत कविता वाचून दाखवली, या सभेचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. यावरून भाजपाने शरद पवार यांच्यावर आरोप करीत, नास्तिक यांनी हिंदू देवदेवतांचे बाप काढले, पवार नेह्मीच हिंदू धर्माचा द्वेष करतात,  हिंदू धर्माची बदनामी करीत देवी देवतांचा अपमान केला नसता आणि जातिवाद केला नसता तर एवढे मोठे झालेच नसते, असे म्हणत  भाजपने ट्वीट वर म्हटले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!