चोपडा प्रतिनीधी । चोपडा येथील वनरक्षक विपुल पाटील व प्रगतीशील शेतकरी वासुदेव महाजन यांना राज्यस्तरीय निसर्ग मित्र पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले.
पाटील व महाजन यांना पर्यावरण व वृक्ष संवर्धनात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती धुळे व नंदुरबार तालुका विधायक समिती कडून दि.२० रोजी राज्यस्तरीय निसर्ग मित्र पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.यावेळी निसर्ग मित्र समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार अहीरे, धुळे जिल्हाध्यक्ष डी. बी.पाटिल,चोपडा तालुका निसर्ग मित्र समिती अध्यक्ष वासुदेव महाजन, संपर्क प्रमुख विश्राम तेले आदी उपस्थीत होते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल विपुल पाटील व वासुदेव महाजन यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.