यावल प्रतिनिधी । येथील पटेल समाज दफनभूमीच्या संरक्षण भिंतीभोवती अतिक्रमण होत असून याला आळा घालण्याची मागणी होत आहे.
याबाबत वृत्त असे की, यावल शहरातील हडकाई नदीच्या कडेला लागुन पटेल समाज बांधवांचे कब्रस्थान( दफनभुमी) असुन याच्या चारही बाजुस संरक्षण भिंत बांधली आहे. यातील पुर्वेकडील बाजुस कब्रस्थानाच्या प्रवेशव्दारा जवळ काहींनी विटांची भट्टी लावली आहे. भट्टी लावतांना संबंधित भट्टी टाकणार्यांनी संरक्षण भिंतींची माती खोदल्यांने भिंतीचा संपुर्ण भाग हा उघडा पडला असुन, भिंत ही कुठल्याही क्षणी कोसळण्याची शक्यता असुन, या प्रश्नाकडे तात्काळ महसुल विभागाने लक्ष देवुन त्या बेकायदेशीर लावण्यात येत असलेल्या त्या विटभट्टी वाल्यांना नोटीस बजावण्यात यावी व कब्रस्तानाच्या भिंतीस होणारे संभाव्य धोके टाळावे अशी मागणी पटेल समाज कब्रस्तान देखरेख समितीच्या वतीने करण्यात आली आहे.