गोजोरा येथील जुगार अड्डयावर धाड

0

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील गोजोरा येथील जुगार अड्डयावर आज पोलीस पथकाने धाड टाकून ९ जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत वृत्त असे की, भुसावळ तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील फेकरी टोलनाका येथे नाकाबंदी करीत असताना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळल्यावरून गोजरा या गावी जाऊन धाड टाकली. यामध्ये संतोष गोकुळ कोळी याच्या घरात तो काही लोकांसह झन्ना-मन्ना नावाचा जुगारचा खेळ खेळतांना ९ जण आढळून आले. त्यांच्या विरुद्ध मुंबई जुगार कायदा कलम ४.५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्या अंगझडती मध्ये रोख रक्कम १९५०० रु आणि ४ मोटर सायकल व मोबाईल सह एकूण २,६४,५०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. संबंधीत कारवाई उप विभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड व पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरिक्षक गजानन करेवाड, पोहेकॉ विठ्ठल फुसे, अजय माळी, प्रदीप इंगळे, रियाज काझी यांनी केली आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल युनूस शेख करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.