जळगाव (प्रतिनिधी) नाशिककडून भुसावळकडे जाणाऱ्या रेल्वेतून दरवाज्यात बसून प्रवास एका तरुणाला चांगलाच महागात पडला आहे. पाचोरा येथे चालत्या गाडीत प्लॅटफॉर्मचा जबर धक्का लागल्याने तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना आज घडली आहे.
याबाबत माहिती अशी की, प्रकाश महादेवराव विश्राम (वय 30, नागपूर) हा नाशिक येथे कामाला आहे. प्रकाश सध्या बेरोजगार असून कामाच्या शोधासाठी नाशिकहुन भुसावळकडे रेल्वेने जात होता. प्रवास करत असताना प्रकाश रेल्वे डब्याच्या दरवाज्याजवळ बसला होता. प्रकाशला पाचोरा रेल्वे स्थानकावर गाडी थांबत नसल्याची माहिती नव्हती. त्यामुळे गाडी पाचोरा रेल्वे स्थानकावर पोहोचताच दरवाजाच्या खाली असलेल्या पायाला पाचोरा प्लॅटफॉर्मचा जोराचा फटका बसला. या फटक्यात प्रकाश गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने जिल्हा सामान्य शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत अद्याप पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.