मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबई मध्ये लोकसभा निवडणूक – 2024 च्या पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे, 2024 रोजी पार पडणार आहे. खर तर हा लोकशाहीचा उत्सव आहे. मतदार म्हणून मतदान करण्याकरीता या उत्सवात लोकांची भूमिका फार महत्त्वाची आहे. लोकसभा निवडणुक 2024 मध्ये मतदान करण्यासाठी मेट्रो प्रवाशांना प्रोत्साहित करून त्यांच्या मतदानाच्या कर्तुत्वाबाबत जाणीव करून देण्यासाठी, महामुंबई मेट्रो मतदार जागरूकता आणि सहभाग या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत आहे. मुंबई मेट्रोने जास्तीत जास्त नागरिकांनी प्रवास करावा या दृष्टीने महामुंबई मेट्रो प्रयत्नशील आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करता येईल आणि त्यांना केंद्रापर्यंत आरामदायक प्रवास करता येणार आहे.
मतदान प्रक्रियेमध्ये मतदारांचा जागरूकपणे सहभाग वाढावा यासाठी शासनामार्फत सर्व स्तरातून जनजागृती करण्यात येत आहे. मुंबई मेट्रो मार्ग 2 अ आणि 7 च्या सर्व प्रवाशांना 20 मे, 2024 रोजी प्रवासी तिकिटावर १०% सवलत देण्याचा महत्त्वाचा निर्णय महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाने घेतला आहे. ही सवलत मुंबई मेट्रो १ कार्ड, मोबाईल क्यूआर तिकीट, पेपर तिकीट अशा सर्व माध्यमातून देण्यात येणार आहे. मुंबई मेट्रो मार्ग 2 अ आणि 7 च्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 90 कोटी नागरिकांनी प्रवास केला असल्याने मुंबई मेट्रोचा उपयुक्तता अधोरेखित झाली आहे. सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नागरिकांना मेट्रोच्या माध्यमातून आरामदायक प्रवास करत, मतदानाचा आपला हक्क बजावता यावा यासाठी महामुंबई मेट्रो प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.