यावल प्रतिनिधी । येथील एसटी बस आगारात कार्यरत असलेल्या महिला कंडक्टरकडून प्रवाशांशी गैरवर्तणुकींची तक्रार यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक यांच्याकडे करण्यात आली होती. याप्रकरणी आगारप्रमुखांनी तात्काळ दखल घेत “त्या” महिलेस निलंबित केल्याची माहिती सुत्रांकडून नुकतीच मिळत आहे.
या संदर्भात सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, (दि.२३ डिसेंबर) रोजी रात्री ८:२० वाजेच्या सुमारास भुसावळ बस स्थानकावरून यावलकडे येणाऱ्या एस.टी बसमध्ये वाहक अंजली वाणी या कार्यरत असतांना या बसमध्ये जवळपास ७ ते ८ एवढेच प्रवाशी असताना बस जवळ यावलला जाण्यासाठी उभे असलेले १० ते १२ प्रवाशी उभे होते. यावेळी संपुर्ण बसखाली असताना देखील काही प्रवाशांनी बसमध्ये बसवून घेण्याची वाहक अंजली वाणी यांना विंनती केली असता त्यांनी प्रवासांना गाडीत न बसून देता एसटीचा दरवाजा बंद करून गाडी चालविण्यास सांगितले. यावेळी एसटी बसलेल्या प्रवाशांनी देखील वाहक अंजली वाणी यांना प्रवाशीमहिला व लहान मुले आहेत त्यांनाही सोबत घ्या, अशी विनंती केली असुन वाहक वाणी यांनी बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना सांगितले, ‘तुम्हाला बसायाचे असेल तर बसा अन्यथा तुम्ही खाली उतरा, असे संभाषण करत त्यांना बसमधील प्रवाशांशी हूज्जत घातली.
तक्रार निवेदन
संदर्भात प्रवाशांकडुन मिळालेल्या माहितीनुसार अशाच प्रकारे काही महिला वाहकाकडुन जेष्ठ व महिला आदी प्रवाशांना उद्धटपणाची वागणुक दिली जात असल्याच्या तक्रारी प्रवासी नागरीकांकडुन करण्यात येत आहे. यासंदर्भात प्रवाशांना अशा प्रकारची वागणुक देणाऱ्या वाहकांवर कठोर कारवाई करावी, असा मागणीचे निवेदन यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक एस.व्ही.भालेराव यांना आज (दि.२४) प्रवाशांच्या वतीने देण्यात आले आहे.
यांनी केली तक्रार
तक्रार निवेदनावर जयश्री चौधरी, ज्योती वाणी, रुपाली वाणी, सुर्वणा वाणी, दिपाली खरे, भाग्यश्री वाणी, सिद्देश वाणी, उन्नती चौधरी, प्रिया वाणी, ऐश्वर्या वाणी यांच्यासह आदी प्रवाशांनी आगार व्यवस्थापक एस.व्ही.भालेराव यांनी तडकाफडकी निर्णय घेवुन प्रवाशांशी गैरवर्तणुक करणाऱ्या वाहक अंजली वाणी यांना तात्काळ निलंबीत करावे, असे म्हटले असून यावल आगारात कुठल्याही प्रकारची गैरवर्तणुक व बेशिस्ती खपवून घेणार नसल्याचे संकेत यावेळी प्रवासांकडून देण्यात आले आहे.