यावल -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना शासनाच्या वतीने मिळणारी नविन पेन्शन रद्द करून जुनीच पेन्शन योजना लागु करावी यासह विविध मागण्यासाठी राज्य पातळीवरील विविध शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी पुकारलेल्या उद्या दिनांक १४ डिसेंबर पासुन पुकारण्यात आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी बेमुदत संपात मोठा सहभाग नोंदविला आहे.
राज्य शासनाने १९८२ मध्ये लागु केलेली होती मात्र महाराष्ट्र शासनाने ही पेन्शन योजना बंद करीत शासकीय कर्मचाऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोप करण्यात येत असुन, जुनी पेन्शन योजना पुर्वरत सुरू करावी यासाठी येथे उद्या दिनांक १४ डिसेंबर २०२३ पासुन होणाऱ्या शासकीय कर्मचारी यांच्या बेमुदत संपात यावल तालुक्यातील शेकडो कर्मचारी सहभागी होणार असुनए तालुक्यातील विविध शासकिय सेवेतील कर्मचाऱ्यांचा संपात सहभागामुळे नागरीकांच्या अनेक शासकीय कामांचा खोळंबा होणार असुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र बंद होऊन याचा विपरित परिणाम होणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या विविध शासकीय सेवेतील कर्मचारी नविन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना सुरू करावी या मागणीसह विविध न्यायायीक मागण्यांसाठी राज्यातील विविध शासकीक कर्मचारी यांच्या सर्व संघटनांनी पुकारलेल्या दिनांक १४ डिसेंबर पासुनच्या बेमुदत संपात यावल तालुक्यातुन महसुलचे ७ मंडळ अधिकारी, २६ तलाठी , १o महसुल सहाय्यक , ६ अव्वल कारकुन , ४ शिपाई अशी ८४ कर्मचारी, तालुक्यातील कंत्राटी पद्धतीवर असलेले ५ ग्रामसेवक वगळ्रन तालुक्यातील एकुण ४३ ग्रामसेवक या संपात सहभागी होत असुन, या शिवाय जळगाव जिल्ह्यातील ४९ आदीवासी आश्रम शाळांचे शासकीय व निमशासकीय असे एकुण ९०० शिक्षक, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती यावल, तालुक्यातील एकुण २४५ जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक शाळाचे एकुण ११०० शिक्षक यांच्यासह आदी संघटनांनी या संपात सहभागी होणार आहे .