परसाडे ग्रामसेवकाचे निलंबन वाद पुन्हा तापले; सरपंचाची पंचायत समिती कार्यालयात धाव

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालूक्यातील परसाडे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक निलंबनाचा वाद पुनश्च यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या दफ्तरी पोहचला असून लोकनियुक्त सरपंच मिना राजु तडवी यांनी आपल्या सहकारी सदस्यांसह भेट घेऊन ग्रामसेवक निलंबन कार्यवाही बाबत माहिती मागितली आहे.

परसाडे तालूका यावल या ग्रामपंचायतचे ग्रामसेवक मजित अरमान तडवी यांच्या विरूद्ध सरपंच मिना राजु तडवी यांनी तक्रारी वरून दिनांक ३१ / १०/२०२३ रोजी पारित निकाल ३० / ११ / २o२३ रोजी यातील ग्रामसेवक मजीत अरमान तडवी यांना परसाडे ग्रामपंचायतच्या १५ वित्त आयोग योजनेत दफ्तर तपासणी कामी उपलब्ध करून न देणे, सरपंच यांना विश्वासात न घेता डिएससीचा वापर करणे आदी कर्तव्यात कसुर केल्याच्या विषयात जबाबदार धरण्यात येवुन निलंबित करण्या संदर्भात आदेश करण्यात आलेले आहे. दरम्यान असे असतांना दिनांक ३० डिसेंबर रोजी निलंबीत असतांना ग्रामसेवक मजित तडवी यांनी परसाडे व वड्री ग्रामपंचायतच्या ग्रामसभा घेतल्याची तक्रार परसाडे सरपंच मिना तडवी यांनी गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड यांच्या कडे केली.

यावेळी संबधित ग्रामसेवकास निलंबनाचे आदेश बजावण्यात आल्याची माहिती सरपंच यांना दिली, दरम्यान निलंबित ग्रामसेवक मजीत तडवी यांच्याशी संपर्क साधला असता परसाडे ग्रामपंचायतच्या सरपंच मिना तडवी यांनी राजकीय आकस भावनेने आपल्या विरूद्ध तक्रार केली असुन, विस्तार अधिकारी यांनी वरवर चौकशी अहवाल सादर केलेला असल्याचे सांगुन २०२२ व २०२३च्या लेखा परिक्षण झाल्याचे अहवाल आपण दिनांक ३०/१०/ २o२३ रोजी संपुर्ण जबाब गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर केला असल्याचे सांगीतले व लेखा परिक्षणात सुद्धा अनियमता आणि ग्रामपंचायतच्या कारभारात अपहार केले नसल्याचे नमुद केलेले नसल्याचे सांगुन आपणास निलंबित व निलंबनाची कारवाई करण्यात येऊ नये असे पत्र गटविकास अधिकारी यांना दिले असुन, सदरचा विषय उच्च न्यायलयात न्यायप्रविष्ठ असतांना निलंबनाचे आदेश तांबविण्यात यावे असे ग्रामसेवक मजीत तडवी यांनी आपली बाजु मांडतांना म्हटले आहे.

Protected Content