पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांनी पारोळा व एरंडोल शहरातील नव्याने विविध विकास कामांसाठी २० कोटी रूपयांचा कामांना मंजुरी मिळाली आहे.
पारोळा व एरंडोल शहराचा आजुबाजुला असलेल्या शहरांमध्ये सर्व सोयी-सुविधा असतांना आपल्या शहरांमध्ये देखील हा विकास व्हावा यासाठी नागरीकांकडुन सातत्याने आमदार चिमणराव पाटील यांचेकडे मागणी होत होती.
हि मागणी होत असतांना आमदार चिमणराव पाटील यांनी देखील वेळोवेळी पाठपुरावा करत मतदारसंघाचा सर्वांगिण विकास होण्यासाठी आपल्या दुरदृष्टीने आतापर्यंत दोन्ही शहरांसह मतदारसंघाचा विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करत असतात. याच प्रत्येय म्हणजे आतापर्यंत पारोळा व एरंडोल शहराचा विविध विकासकामांसाठी आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांनी ९० कोटी रूपयांचा निधी खेचुन आणला तर पारोळा शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी ५३ कोटी रूपयांना मंजुरी मिळाली आणि एरंडोल शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या २७ कोटी रूपयांचा योजनेस येत्या आठवड्याभरात मंजुरी मिळणार आहे.
एवढा सगळाच विकासकामांचा धडाका सुरू असतांना आज पुन्हा नव्याने आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांनी पारोळा व एरंडोल शहराचा विकासासाठी २० कोटी रूपयांची भर पडलेली आहे. यात पारोळा नगरपरिषद हद्दीतील गट नं.१३१ आरक्षण क्रमांक ३४ मध्ये अत्याधुनिक नाट्यगृहाचे बांधकाम करणेसाठी – १५ कोटी, एरंडोल नगरपरिषद हद्दीतील कासोदा दरवाजा भागातील स्मशानभुमी नुतनीकरणासह उर्वरीत विकासकामे करणेसाठी – २ कोटी, एरंडोल नगरपरिषद हद्दीतील न.पा.दैनिक बाजार ओटे बांधकाम करणेसाठी – १.५० कोटी व एरंडोल नगरपरिषद हद्दीतील अत्याधुनिक व्यायामशाळा साहीत्यासह इमारत बांधकाम करणेसाठी – १.५० कोटी या कामांचा समावेश आहे.
यामुळे पारोळा शहरात शिक्षण, सांस्कृतिक, मनोरंजन, कला यासाठी मोठे व्यासपिठ उपलब्ध होणार आहे. तर एरंडोल शहरातील स्मशानभुमीत अंत्यविधी साठी येणाऱ्या नागरीकांची होत असलेली मोठी गैरसोय दुर होणार आहे तसेच हातगाडी वाल्यांना एक हक्काचे आपले दालन उपलब्ध होणार आहे आणि नवतरूणांना तालिमेसाठी एक अत्याधुनिक इमारतीसह साहीत्य उपलब्ध होणार आहे. यामुळे नागरीकांचा सर्वच सोयी-सुविधा पुर्णत्वाकडे जात असतांना एक समाधानाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तसेच या सर्व राज्याचा सत्यानाट्याचा परिस्थितीवर बिनबुडाचे आरोप आणि टिका करणाऱ्यांना आमदार चिमणराव पाटील यांनी दाखवुन दिले आहे कि आबासाहेब स्वतःचा स्वार्थापोटी नाही तर फक्त आणि फक्त मतदारसंघाचा सर्वांगिण विकासासाठीच आपली दुरदृष्टी ठेवतात. मतदारसंघाचा सर्वांगिण विकासासाठी वेळोवेळी योग्य ते सहकार्य मिळत असल्याबद्दल आमदार चिमणराव पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे आभार मानले आहेत.