ग्रामपंचायत निवडणूक : रावेर तहसीलदारांनी दिले कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

 

रावेर, प्रतिनिधी । तालुक्यातील ४८ ग्राम पंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आज तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी ८४० कर्मचा-यांना प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले.

रावेर तालुक्यातील ४८ ग्राम पंचायतीसाठी येत्या दि. १५ जानेवारीला मतदान आहे. या मतदानाच्या पार्श्वभुमीवर आज तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी निवडणुकी संदर्भात सविस्तर माहिती दिली. निवडणूकची प्रात्यक्षिक दाखविले. ८४० कर्मचा-यांना दोन शिप्ट मध्ये निवडणूकीचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी निवडणुक निरिक्षक विक्रम बांदल देखिल उपस्थित होते. प्रशिक्षणाला सहकार्य म्हणून अव्वल कारकुन विठोबा पाटील यांनी देखिल सहकार्य केले.

आणि तहसिलदार संतापल्या..

दरम्यान ४८ ग्राम पंचयात निवडणूकची नॉन-स्टॉप माहिती उपस्थित कर्मचा-यां तहसिलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी समजवून सांगत असतांना निंबोल येथील उप शिक्षक विजय चौधरी हे प्रशिक्षण गांभर्याने न घेता बाहेर फिरत होते. यावेळी तहसिलदार यांनी त्यांना प्रशिक्षणस्थळी बोलावून निवडणूक संदर्भात माहिती विचारली असता त्यांना देता आली नाही..यामुळे तहसिलदार चांगलेच संतापले होत्या.

Protected Content