पारोळा तालुका प्राथमिक शिक्षक संघाची कार्यकारणी जाहीर

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुका प्राथमिक शिक्षक संघाची कार्यकारणीचे पूनर्गठन रविंद्र सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी जिल्हा उपाध्यक्षपदी अनिल दयाराम चौधरी यांची फेरनिवड करण्यात आली.

तर नरेंद्र सुभाष पाटील, ज्ञानेश्वर दशरथ मराठे, नितीन रमेश पाटील यांची जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आले. शिवाय पारोळा तालुका कार्यकारणी खालील प्रमाणे प्रवीणकुमार शंकर कोळी, यांची तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सरचिटणीस दिपक पाटील, कार्यालयीन चिटणीस योगेश चौधरी, कार्याध्यक्ष विजय मोरे, कोषाध्यक्ष ईश्वर धोबी, उपाध्यक्ष श्रीराम पाटील, रामेश्वर भदाणे, हिम्मत मोरे, नितीन पाटील, कपिल शिरूडकर, विभागीय अध्यक्ष शेख कलंदर शेख कमरोद्दिन, हेमंत पाटील, चिटणीस संजय पाटील, दिपक देवरे, शशिकांत वाणी, पंडित पाटील, भगवान पाटील, प्रसिद्धीप्रमुख संजय मरसाळे, उमेश महाजन, विलास रखमे, राहुल पाटील, विशाल देशमुख, संघटक कैलास मोरे, उपेंद्रकुमार आढाव, तुषार पाटील, राजू राठोड, समाधान पाटील, कल्याण पाटिल, प्रल्हाद परदेशी. ऑडिटर अनिल सोनवणे, निलेश पाटील, सुभाष गवळे, ओंकार चव्हाण, विलास पाटील. ज्येष्ठ सल्लागार प्रशांत पाटील, सुनील काटे, हरिश्चंद्र पाटील, सिद्धार्थ सरदार, संजय पाटील, जगदीश पाटील, यशवंत शिंदे, शरद नारायण वाणी, यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली.

तसेच अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ ही आंतरराष्ट्रीय शिक्षक संघटनेशी संलग्न असून, हिच्या देशभरात सर्वत्र शाखा आहेत. हि एकमेव अशी मातृ संघटना असून या संघटनेचे आचार्य दोंदे हे संस्थापक होते. त्यांनी या संघटनेचे जाळे पूर्ण भारतभर पसरलेले असून, अत्यंत भरपूर काम व शिक्षकांच्या समस्या सोडवणारी संघटना म्हणुन ओळखली जाते. आजही कुठल्याही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शिक्षक परिषदांमध्ये या संघटनेच्या कार्यकर्त्यांना आमंत्रित केलं जाते.

Protected Content