पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील तामसवाडी येथून डिजेच्या वाहनातून सामग्री चोरणार्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
तालुक्यातील तामसवाडी येथील फिर्यादी दिलीप देविदास चौधरी यांनी त्यांचे घरासमोर अंगणात लावलेले डी जे ची आयशर गाडी क्र एमएच ४१ सी ७८१९ मध्ये असलेले ५०,०००/-रुपये किमतीचे ४ व्हीसीपी लाईट,२००००/-रू किमतीची पायलट पेटी,८०००/-रुपये किमतीचे कॉर्डलेस माईक,व १००००/-रू किमतीचा आवाज कमी जास्त करण्याचा मिक्सर असा एकूण ८८०००/-रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यानी चोरून नेला होता. या प्रकरणी पारोळा पोलीस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी नमूद गुन्ह्याचा तपास पो. ना. प्रदीप पाटील यांच्याकडे देऊन मार्गदर्शन करून तपासाचे चक्र फिरविले असता त्यांना याची गुप्त माहिती मिळाली. नमूद गुन्ह्यातील आरोपीकडे एक इसम पाठविला व नमूद मुद्देमाल असेल तर मी विकत घेतो त्यावरून आरोपी स्वतः होऊन तयार झाला व दिनांक २३ रोजी संध्याकाळी सात वाजता मुद्देमाल देण्याची वेळ ठरली तेव्हा विकत घेणारा व साध्या कपड्यात ६ पोलीस तामसवाडी येथे गोपनीय रित्या सापडा लावले असता रोहित शिवाजी पाटील वय २२ रा तामसवाडी यास वरील सर्व मुद्देमाल सह पोलिसांनी ताब्यात घेताच आरोपी रोहित पाटील याने त्याचे सोबतचे आणखी गणेश रघुनाथ पवार वय २० वर्ष व रोहित श्याम नाना पाटील वय १९ वर्ष सर्व रा तामसवाडी यांचे नाव सांगितले. या तिघांनीही चोरीची कबुली दिली असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, या तिन्ही आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच या तिघांनी तामसवाडी येथील शाळेतून जून महिन्यात टिव्ही चोरला होता अशी कबुली दिली आहे. या आरोपींची आणखी सखोल विचारपूस चालू असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. ही कामगिरी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शना खाली,पो ना प्रदीप पाटील,पो कॉ हेमचंद्र साबे, पो कॉ राहुल पाटील,आशिष गायकवाड यांनी कामगिरी केली आहे.