बॅनरचे नुकसान करणार्‍या दोघांविरूध्द गुन्हा

पारोळा प्रतिनिधी । पालकमंत्री ना. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरचे नुकसान करणार्‍या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा ५ जून रोजी वाढदिवस होता. यानिमित्त शिवसेनेचे नूतन जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य डॉ. हर्षल माने यांनी अमळनेर फाट्याजवळ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या शुभेच्छांचे बॅनर लावले होते. दरम्यान, चोरवड येथील रहिवासी सचिन पाटील व पराग गुंजाळ हे अमळनेर येथून ६ रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास परत येत होते.

या वेळी तोंडाला रुमाल बांधून दोन अज्ञात तरुण या बॅनरवर दगड व चिखल फेक करुन नुकसान करत होते. या दोघांना पाटील व गुंजाळ यांनी या संदर्भात हटकले असता त्या दोन्ही तरुणांनी त्यांच्या दगड फिरकवत धमकी दिली. शिवीगाळ करत त्या दोघांनी पलायन केले. या अनुषंगाने पारोळा पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार दोन्ही अज्ञात तरूणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content