पारोळा प्रतिनिधी । शहरातील आई झपाटभवानी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या महिलेची घाईगडबडीत विसरून गेलेली पर्स दोघा सेवेकरांनी प्रामाणिकपणा दाखवत नगरसेवक यांच्या उपस्थित परत केली.
याबाबत माहिती अशी की, शहरातील आई झपाटभवानी मंदिरात दर्शनासाठी आलेली भगिनी कासार ताई घाईगडबडीत आपली पर्स विसरून गेली होती. सदर पर्स मंदिरात जावेदखान बेलदार आणि संतोष जोगी या सेवकऱ्यांना मिळाली त्यांनी नगरसेवक मंगेश तांबे यांच्याशी संपर्क केला. त्यांनी पारोळ्याचे उपनगराध्यक्ष मंगेश तांबे यांच्याकडे प्रामाणिकपणे आणून जमा केली. या पर्समध्ये जवळपास 35 हजाराचे मंगळसुत्र आणि रोख रक्कम होती.
झपाट भवानी मंदिरात कासारताई मंदिरात विचारपूस करण्यासाठी आल्या असता सदर पर्स विषयी त्यांना सर्व गोष्टींची विचारपूस करून तपासून परत केली व संतोष जोगी व जावेद खान बेलदार यांचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे. त्यावेळी पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार व कृउबा सभापती अमोल पाटील, उपनगराध्यक्ष मंगेश तांबे, नगरसेवक पी.जी.पाटील, शिवसेनेचे शहर प्रमुख अशोक मराठे, माजी शिवसेना प्रमुख चौधरी, दिलीप चौधरी, धीरज महाजन, मंदिरातील सेवेकरी, मंदिर परिसरातील नागरिक उपस्थित होते.