Home Cities पारोळा पारोळ्यात रंगला माऊली संवाद कार्यक्रम

पारोळ्यात रंगला माऊली संवाद कार्यक्रम

0
44

mauli samvad parola

पारोळा प्रतिनिधी । शिवसेना नेते आदेश बांदेकर यांनी आज माऊली संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून पारोळा-एरंडोल मतदारसंघातील महिलांशी संवाद साधला.

आदेश बांदेकर यांची माऊली संवाद यात्रा आज जळगाव जिल्ह्यात आलेली आहे. याच्या अंतर्गत जळगाव येथे सकाळी सरदार पटेल भवनात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यानंतर दुपारी पारोळा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. येथे आदेश बांदेकर यांनी मतदारसंघातील माता-भगिनीशी संवाद साधला. त्यांनी अतिशय खेळकरपणे महिलांना बोलते केले. त्यांनी त्यांच्या दैनंदिन जीवनातील समस्यांची माहिती जाणून घेत यासाठी शिवसेना नेमके काय करत आहे याची माहिती दिली. या कार्यक्रमाला अतिशय उदंड प्रतिसाद लाभला.


Protected Content

Play sound