पारोळ्यात घरासमोरून दुचाकी लंपास

bike chori 201895 102842 05 09 2018

पारोळा प्रतिनिधी । शहरातील एका घरासमोरून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरल्याची घटना ही उघडकीस आली आहे. पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, सुनिल मुरलीधर कायस्थ रा.राणी लक्ष्मीबाई नगर यांच्या घरासमोर 7 जानेवारी रोजी रात्री नेहमीप्रमाणे दुचाकी क्रमांक एम एच 19 सिके 7103 ही होंडा कंपनीची दुचाकी अंगणात लावली होती. अज्ञात चोरट्याने रात्रीचा फायदा घेत ती चोरून नेल्याची घटना दुसऱ्या दिवशी उघडकीस आली आहे.

सुनील कायस्थ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध 40 हजार रुपये किमतीची मोटरसायकल चोरीचा गुन्हा हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील अधिक तपास हवालदार बापू पाटील करीत आहे. दरम्यान शहरात चोरीच्या घटना या नियमित सुरुच आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.

Protected Content