चोपडा, प्रतिनिधी | येथील पंकज इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आज (दि.१५) पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्याध्यापिका व पालक प्रतिनिधी उपस्थित होते.
सभेत शाळेतील विद्यार्थ्यांनी Rhymes, poems, sense organs ,Months of the year, Days of the week यांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या वर्षातील उपक्रमांची माहिती व अत्याधुनिक स्मार्ट शिक्षणासाठी सुरू असलेल्या कृती संबंधी सविस्तर माहिती पालकांना मुख्याध्यापिका सौ. निता पाटील यांनी दिली. एकूणच संस्कारांसोबत स्मार्ट शिक्षण व बालकांचा विकास विविध ऍक्टिव्हिटी सादरीकरणामधून पालकांना दिसून आला. पालक प्रतिनिधी अतुल पवार यांनी बालकांच्या विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले व पालकांना मार्गदर्शन व विद्यालयातील सर्व उपक्रमास सहकार्याबद्दल आभार मानले. पालक सभा यशस्वी होण्यासाठी भावना भाट, अनिता पाटील, जोत्सना निकुंभे, तस्निम शेख, शितल भावसार, अनामिका ननावरे, गणेश साळुंखे, बाळू पाटील, सुलभा पाटील, रेखा पवार यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सारिका पवार यांनी केले तर आभार अश्विनी सावंत यांनी मानले.