बस चालवतांनाच अर्धांगवायूचा झटका : चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील आगारातून भुसावळकडे बस घेऊन जात असताना ५८ वर्षीय एसटी बस चालकाला अंजाळे गावाजवळ अचानक अर्धांगवायूचा तीव्र झटका आला. प्रसंगावधान राखत त्यांनी बस थांबवली. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तातडीने त्यांना भुसावळ आणि नंतर जळगाव येथील खाजगी रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

चालक शालिक वसंत पाटील-बारी (वय ५८, रा. जुना भाजी बाजार, बारी वाडा, यावल) हे यावल एसटी आगारातून भुसावळकडे बस घेऊन निघाले होते. अंजाळे गावाजवळ अचानक त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. मात्र, प्रसंगावधान राखत त्यांनी बस सुरक्षित थांबवली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी हलवले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

यावल आगारातील अनुभवी चालकाच्या आकस्मिक निधनामुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा आणि नातू असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेबाबत यावल आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी दुःख व्यक्त करत, एसटी महामंडळाच्या वतीने त्यांच्या कुटुंबाला योग्य ती मदत दिली जाईल, असे आश्वासन दिले.

<p>Protected Content</p>