जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली येथील बसस्थानकाजवळील पानटपरीला मध्यरात्री दोन वाजता एका पिकअप वाहनाने जोरदार धडक दिल्याने पानटपरी जमीनदोस्त झाल्याची घटना १४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री घडली होती. चार दिवसानंतर याप्रकरणी सोमवारी १८ ऑक्टोबर रोजी दुपारी पिकअप मालवाहू चालकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत महिती अशी की, पुनमचंद श्रावण बारी (वय-३९) यांची तालुक्यातील शिरसोली येथील बसस्थानकासमोर पानटपरी आहे. १४ ऑक्टोबर रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास मालवाहू वाहन (एमएच २० ईएल ७५८१) भरधाव वेगाने येणारी मालवाहू पिकअप लक्ष्मी पान सेंटरला धडकली यात पान सेंटर जमीनदोस्त झाले आहे. चार दिवसांनंतर १८ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता टपरीधारक पुनमचंद बारी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात मालवाहू चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राठोड करीत आहे.