कॉप्यांसाठी कायपण…! बारावीच्या पहिल्याच पेपरला कॉप्यांचा सुळसुळाट

जळगाव प्रतिनिधी । कॉपीला अटकाव करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या तरी बारावीच्या पहिल्याच पेपरला अनेक केंद्रांवर उघडपणे कॉप्यांचा सुळसुळाट दिसून आला.

आजपासून बारावीची परीक्षा सुरू झाली आहे. परिक्षांमध्ये कॉपी हा सर्वात महत्वाचा मुद्दा असतो. या अनुषंगाने बारावीची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र याची तमा न बाळगता अनेक ठिकाणी सर्रास कॉप्या करण्यात आल्याचे दिसून आले आहे. काही परीक्षा केंद्रांवर तर अगदी उघडपणे कॉप्या पुरवण्यासाठी अनेकांचा आटापीटा दिसून आला. पहिल्याच दिवशी भरारी पथकांनी १४ विद्यार्थ्यांना डिबार केले. मात्र बर्‍याचशा केंद्रांवर अगदी उघडपणे कॉप्यांचा पाऊस पडल्याचे दिसून आले.

जळगाव शहरातील एका महाविद्यालयात कॉपीसाठी आटापीटा करणारा तरूण छायाचित्रात दिसून येत आहे.

Add Comment

Protected Content