Home क्राईम चोरट्यांनी फोडली पानटपरी; सामानांची केली चोरी

चोरट्यांनी फोडली पानटपरी; सामानांची केली चोरी


चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील गलंगी येथे पानटपरी फोडून अज्ञात चोरट्यांनी १८ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. चोपडा ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, सखुबाई छगन भाई (वय-३५) रा. धानोरा ता. चोपडा यांचे तालुक्यातील गलंगी येथे पानटपरीचे दुकान आहे. १० एप्रिल रोजी रात्री आठ वाजता दुकान बंद करून ते घरी निघुन गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी पानटपरी फोडून १८ हजार ३५६ रूपयांचा सामान चोरून नेल्याचे ११ एप्रिल रोजी सकाळी उघडकीला आले. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रितेश चौधरी करीत आहे. 


Protected Content

Play sound