यावल (प्रतिनिधी)। केंद्र शासनाची म्हत्वकांक्षी अशी पेन्शन योजनाही वयोवृद्ध शेतकरी बांधवांसाठी जिवनदायी ठरणार असुन या योजनेत २२ पासुन चाळीस वर्ष वयोगटाच्या शेतकऱ्यांनी ५५ ते २०० रुपयांपर्यत मासिक हप्ता भरून ६० वर्ष पुर्ण झाल्यावर शेतकऱ्यास सात लाख ३६ हजार रुपये मिळतील अशी माहीती उपास्थित ग्रामस्थ आणी शेतकरी यांना मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी डॉ. आविनाश ढाकणे यांनी मारूळ येथील कार्यक्रमा प्रसंगी दिली.
मारूळ तालुका यावल येथील उर्दु अरबी मदरश्याच्या सभागृहात झालेल्या शेतकरी बांधवांच्या दृष्टीकोणातुन अतिश्य महत्वपुर्ण अशा बैठकीत मार्गदर्शन करतांना जळगावचे जिल्हाधिकारी डॉ.आविनाश ढाकणे यांनी पोकरा नानाजी देशमुख कृषी संजीवीनी प्रकल्पासह केन्द्र शासन आणी राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती यावेळी डॉ. ढाकणे यांनी दिली. या बैठकीला यावलचे जळगाव जिल्हा परिषदचे सिईओ डॉ. बि.एन. पाटील, जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकुर, अनिल भोकरे उपसंचालक कृषी विभाग जळगाव, तहसीलदार जितेन्द्र कुवर, निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार, यावल तालुका कृषी अधिकारी व्ही.एल. तलेले, कृषी सहाय्यक जे.डी. भंगाळे, मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद जिवराम महाजन, जिल्हा परिषद गटनेता प्रभाकर अप्पा सोनवणे, मारूळ ग्रामपंचायतचे सदस्य बाळु तायडे, प्रविण हटकर आदी मान्यवर व ग्रामस्थ क्षेतकरी मोठया संख्येने उपास्थित होते, या बैठकीचे सुत्रसंचलन हाजी युसुफ अली यांनी केले तर उपास्थितांचे आभार बाळु तायडे यांनी मानले.