जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेला कायम राखण्याला आपले प्राधान्य राहणार असल्याचे प्रतिपादन नूतन जिल्हा पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले यांनी केले. ते आज पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.
नूतन जिल्हा पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले यांनी आज सकाळी पदभार स्वीकारला. यानंतर दुपारी त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले की, सध्या मनुष्यबळाची सर्वत्र कमतरता आहे. पोलीस खातेदेखील याला अपवाद नाही. मात्र उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य वापर करण्याला आपण प्राधान्य देणार आहेत. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने आपण चोख नियोजनावर भर देणार असून कायदा व सुव्यवस्थेला प्राधान्य राहणार असल्याचे प्रतिपादन पंजाबराव उगले यांनी केले.
पहा : पंजाबराव उगले यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ.