मोरव्हाल आदिवासी गावात भीषण पाणीटंचाई

raver 2

रावेर (प्रतिनिधी)। तालुक्यातील मोरव्हाल आदिवासी गावात भीषण पाणीटंचाई जाणवत असुन प्रशासनाकडून केलेल्या चारही ट्यूबवेल कोरड्या ठाक होवून बंद पडल्या आहे, तर अधीगृहित केलेल्या विहीरीची देखील पाण्याची पातळी घटल्याने गावात भीषण पाणीटंचाईची समस्या जाणवत आहे. युध्दपातळीवर प्रयत्न करून गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकारी यांनी सोडविण्याची मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे.

आदिवासी भागातील मोरव्हाल या गावाची सुमारे दोन हजार लोकसंख्या असून गावाला एप्रिल मध्येच भीषण पाणीटंचाई समस्या जाणवू लागली आहे. गावात यापूर्वी चार ट्यूबवेल केल्या होत्या परंतु शेकडो फुट खाली खोदुन सुध्दा पाणी लागले नाही. यामुळे प्रशासनाने गावाच्या शेजारी असलेल्या शेतातील विहीर काही महिन्यांपूर्वी अधिगृहित केली होती. परंतु तिचे देखील पाणी पातळी घसरल्याने आदिवासी बांधवांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

जलयुक्तची कामे निकृष्ठ असल्याचा आदिवासीचा आरोप
आदीवासी भागात मोठा गाजा-वाजा करीत गेल्या दोन वर्षांपासून जलयुक्त शिवारची करोडो रुपयांची कामे कागदोपत्री केली. परंतु त्याचा आदिवासीच्या कुठल्याच भागात फायदा झाला नाही. संपूर्ण जलयुक्त शिवारचे कामे लोकप्रतीनिधिंनी घेऊन निकृष्ट कामे करून निघुन गेल्याचे अनेक आदिवासी बांधवांनी बोलून दाखविले. परिणाम म्हणून शासनाचे करोडो रुपये पाण्यात जाऊन गाव थेंब-थेंब पाण्यासाठी भटकंती सुरूच आहे.

Add Comment

Protected Content